‘त्या’ सरकारच्या नाकर्तेपणामुळं ओबीसींसाठी एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजप ओबीसी मोर्चा संघटनेच्या कामाचा आढावा या कार्यकारणी बैठकित  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आताच्या सरकारमुळं म्हणजेच, महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकत नाही, असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढंच नाहीतर हा सरकारचा डाव असल्याचाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

फडणवीस यांनी सांगितले की, “देशाच्या इतिसात पहिल्यांदा एवढे ओबीसी मंत्री बनवणारे कोण असतील? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आपण म्हणायचो बहुजनांचं राज्य येणार, ते आज मोदींचं मंत्रिमंडळ पाहिल्यावर कळतंय. ओबीसींचा खरा पक्ष कोणता? तर तो भाजप आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा मिळवून देण्याचं काम भाजपनं केलं आहे. आज केंद्र सरकराच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी खूप योजना सुरु झाल्या आहेत. ओबीसी समाजाला स्थान देण्यासाठी महामंडळासाठी निधी दिला.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की, “ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झालाय. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट म्हणून जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेलं आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसं सांगतात तसं ते बोलतात.”, असं म्हणत ओबीसी आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची तोफ महाविकास आघाडी सरकारवर डागली आहे.

You May Also Like