माथेफिरूचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

नुकताच विवाहबंधनात अडकलेली मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर एका माथेफिरूने आज सकाळी सातच्या सुमारास घरात घुसून चाकूने वार केले. यामध्ये ते जखमी झाले आहेत..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अजय शेगटे (वय २८) असे पकडण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव आहे.  सोनाली यांचे निगडी, पुणे प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २५ येथे घर आहे. आरोपी हा सकाळी अचानक सोनाली यांच्या घरात घुसला. त्यावेळी सोनाली यांचे आई-वडील घरात होते. अचानक घरात आलेल्या या माथेफिरूने त्यांच्या वडिलांवर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत.  सोनाली यांच्या वडिलांनी अजयला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजयने त्यांच्यावर चाकूने वार केला.

याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडण्यासाठी धाव घेतली त्यावेळी त्यांच्यातही झटापट झाली.  उपस्थित नागरिकांनी पोलिसांना कळविताच काही वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले आहे. अजय हा सोनालीचा फॅन असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. या घटनेचा अधिक तपस निगडी पोलीस करीत आहेत.

You May Also Like