‘हि आहे आमदारांची भावना’; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदें गटाचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. त्यानंतर त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे यांनी आज एक ट्विट करुन शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांचे आमदारांची भावना व्यक्त करणारे पत्र पोस्ट केले आहे. तसेच हे पत्र ट्वीट करताना एकनाथ शिंदे यांनी “ही आहे आमदारांची भावना”, असे कॅप्शन दिले आहे..

आमदार संजय शिरसाट यांनी हे पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल शासकीय निवास्थान सोडून मातोश्रीत राहण्याचा निर्णय घेतला. याच वर्षाची दारं ही अडीच वर्ष आमच्यासाठी बंद होती, असा थेट आरोप शिरसाट यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना भेटायला आम्हाला वाट पाहावी लागत होती, तरीही मुख्यमंत्री भेटायचे नाही, अशी खदखदही या पत्रातून त्यांनी व्यक्त केली आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर हे पत्र शेअर केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like