कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही

नवी दिल्ली | कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही, असं सार्वजनिक आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पंतप्रधानांना दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. टास्क फोर्समधील सदस्य, एम्सचे डॉक्टर, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इं. असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, असो. ऑफ पिडेमिऑलॉजिस्टसच्या तज्ज्ञांनी अहवाल बनवला आहे.

लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूलपणा वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तरुणांना लस देणं किमतीच्या दृष्टीने परवडणारं नाही, असं डॉक्टरांनी म्हटलंय.

लहान मुलांसह सर्वांना लस देण्याऐवजी ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांनाच ही लस देण्यात यावी. पोलिओ किंवा इतर लसी देण्याच्या मोहिमांमधील अनुभव कोरोना लसीकरण मोहीम राबविताना उपयोगी ठरतील, असंही डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे.

डेल्टा प्रकाराचा संसर्ग असलेल्या भागात कोविशिल्डच्या 2 डोसचे 12 आठवड्यांचे अंतर घटवण्याचा विचार करावा, असं डॉक्टरांनी म्हटलंय. तसेच अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

You May Also Like