रत्नागिरीतील तीन बालकांची डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात

रत्नागिरी : जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सर्वाधिक नऊ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. यामध्ये तीन बालकांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली. या तिन्ही मुलांनी यशस्वी मात केली. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले-गावडे यांनी दिलीयं.

दरम्यान जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा प्लस विषाणूने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील येथील आहे. मृत महिला वय हे 80 वर्ष आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील 2908 बालके कोरोना बाधित झाली होती. एप्रिल पासूनच लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान डेल्टा प्लसचेही राज्यात सर्वाधिक नऊ रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या नऊमध्ये तीन बालकांचा समावेश होता. तीन, चार, आणि सहा वर्षे अशी तीन बालकांची वय आहेत. या तिन्ही मुलांनी डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात केली आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!