बीड जिल्ह्यात तीन दिवस कडक लॉकडाऊन

बीड : राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्राधुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांनी स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन चे निर्णय घेतले आहे. बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 3 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तसे आदेश जारी केले आहेत. अनेक वेळा सूचना देऊनही नागरिक सहकार्य करत नाहीत. त्यामुळे बुधवार ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालीय. राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून पुढील तीन दिवस रुग्णालये आणि मेडिकल वगळता एकही दुकान सुरु असणार नाही. त्यामुळे गरजेच्या सामानाची खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येतेय. त्याचबरोबर बंदी आदेश लागू असूनही बीड जिल्ह्यात काही ठिकाणी कापड, तसंच अन्य काही दुकानं सुरु होती. या दुकानांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलीय.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like