श्रीलंकेचे तीन क्रिकेटपटू निलंबित, मायदेशी परतण्याचे आदेश

कोलंबो : सलामीवीर धनुष्का गुणतिलका याचाही निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर डर्‍हॅमच्या रस्त्यावर धनुष्का फिरताना दिसला. इंग्लंडच्या सध्या सुरू असलेल्या दौर्‍यादरम्यान बायो-बबल(जैव सुरक्षा वातावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंना निलंबित करण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी)ही माहिती दिली असून, या तीन क्रिकेटपटूंमध्ये फलंदाज कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

या दरम्याण, सलामीवीर धनुष्का गुणतिलका याचाही निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर डर्‍हॅमच्या रस्त्यावर धनुष्का फिरताना दिसला. या तिन्ही खेळाडूंचा या सामन्यात सहभाग होता. एसएलसीचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी सांगितले की, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने कुसाल मेंडिस, धनुष्का गुणतिलका आणि निरोशन डिकवेला यांना बायो-बबल नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like