अंबड औदयोगिक वसाहतीतील तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात ; चार गावठी कट्टे जप्त

नाशिक : अंबड पोलिसांनी अंबड औदयोगिक वसाहतीत शुक्रवार, दि. २८ मे २०२१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंबड औदयोगिक वसाहत मधील एक्सलो पॉईन्ट येथे सापळा रचुन तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या कडुन चार गावठी कट्टे जप्त केले आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औदयोगिक वसाहतीत एकसलो पॉईन्ट येथे तीन संशयित गावठी कट्टे घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोकॉ. उत्तम सोनवणे, हेमंत आहेर, मुरली जाधव, राकेश राऊत, नितीन सानप, रफीक शेख यांनी अंबड औदयोगिक वसाहतीत शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक्सलो पॉईन्ट येथे सापळा रचला व संशयित आकाश सिंग ( वय २२ ) रा. घरकुल चुंचाळे, ऐरिक कुटूर ( वय २२ ) रा. चुंचाळे, रोहित म्हस्के ( वय २१ ) रा. अंबड यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांची तपासणी केली असता पोलिसांनी त्यांच्या कडून चार गावठी कट्टे ताब्यात घेऊन जप्त केले. या प्रकरणी पुढील तपस अंबड पोलिस करत आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!