दिल्लीत 44 ऑक्सिजन प्लान्ट्स उभारणार, बँकॉकवरुन 18 टँकर्स आयात करणार :अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली  : गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. दरम्यान,वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने 18 पेक्षा जास्त वय असणार्‍या सर्वांसाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,  देशात कोरोना लसीकरणा वेगाने सुरू आहे. याच दरम्यान दिल्ली सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. 1 मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच,  आता दिल्ली सरकारने बँकॉकवरुन ऑक्सिजनचे 18 टँकर्स मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हवाई दलाची विमाने देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

देशातील इतर राज्याप्रमाणे दिल्लीतही ऑक्सिजनची मोठी कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ऑक्सिजनचे हे टँकर्स यायला सुरुवात होणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. केंद्र सरकारशी यासंदर्भात होणारी चर्चा सकारात्मक असल्याचं सांगितलं. तसेच फ्रान्समधून 21 ऑक्सिजन प्लान्ट्स मागवण्यात आले असून वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे प्लान्ट्स बसवण्यात येतील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दिल्ली सरकार येत्या एक महिन्यात एकूण 44 ऑक्सिजन प्लान्ट बसवणार आहे. त्यापैकी 21 प्लान्ट्स फ्रान्सवरुन येणार असून 8 प्लान्ट्स केंद्र सरकार देणार आहे. तर उरलेले सर्व प्लान्ट्स दिल्ली सरकार बसवणार आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयात हे प्लान्ट्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजनची कमतरता दूर करता येणार आहे. आम्ही देशातल्या काही मोठ्या उद्योगपतींनाही मदतीसाठीची पत्रे पाठवली होती. त्यांनीही मदत करण्याचं मान्य केलं आहे” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like

error: Content is protected !!