आजचे राशी भविष्य ; ०२ जुलै २०२१

मेष : कला, साहित्य व शिक्षण अशा क्षेत्रात असणार्‍यांना अर्थप्राप्तीचे नवे मार्ग हाती घेता येतील.
शुभ रंग : हिरवा, शुभ दिशा : पूर्व

वृषभ : अप्रिय बदली, वरिष्ठांची नाराजी व कामातील विलंब टाळण्यासाठी नोकरदारांनी जागरुक रहावे लागेल.
शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा : पूर्व

मिथुन : ऐनवेळी मिळणारी मदत एखादा खर्च वाचविणारी असेल. वृद्धांनी तब्येतीचे तंत्र जपणे हिताचे.
शुभ रंग : लाल, शुभ दिशा : दक्षिण

कर्क : पत्रव्यवहारातून येणारी बातमी सर्वांना आनंद देईल. संततीकडे केलेले दुर्लक्ष परवडणारे नाही.
शुभ रंग : हिरवा, शुभ दिशा : दक्षिण

सिंह : व्यावसायिक गाठीभेठी व वरिष्ठांशी चर्चा यातून प्रगतीचे नवे मार्ग समोर येतील.
शुभ रंग : पिवळा, शुभ दिशा : पूर्व

कन्या : भडक विचार आणि जहाल भाषा सध्या अपयशाची ठरेल. युवकांनी वाहनांची शक्ती वेळीच ओळखलेली बरी.
शुभ रंग : काळा, शुभ दिशा : उत्तर

तुळ : बँका तसेच निरनिराळ्या संस्थांतून कॅशियर पदावर असणार्‍यांनी कोणताही धोका पत्करू नये.
शुभ रंग : पिवळा, शुभ दिशा : पूर्व

वृश्चिक : खर्चाचे मोठे होत जाणारे आकडे कुठे तरी कमी करता येताहेत का तेही पाहणे गरजेचे आहे.
शुभ रंग : निळा, शुभ दिशा : उत्तर

धनु : मुलांच्या नेत्रदीपक यशातून घरातले वातावरण उत्साहदायी ठरेल. वेळ मजेत जाईल.
शुभ रंग : निळा, शुभ दिशा : उत्तर

मकर : महिलांनी स्वयंपाकघरात वावरताना काळजी घ्या. कापणे, भाजणे या सारख्या किरकोळ दुखापती होण्याची शक्यता.
शुभ रंग : निळा, शुभ दिशा : दक्षिण

कुंभ : वैवाहिक जीवनात झालेले गैरसमज दूर झाल्यामुळे नवा उत्साह वाटेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ रंग : काळा, शुभ दिशा : उत्तर

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार यशस्वी होतील. त्यातून महत्त्वाचे प्रश्न सुटल्याचे समाधान मिळेल.
शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा : दक्षिण

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like