आजचे राशिभविष्य ; १८ मे २०२१

मेष – शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : पश्चिम
कामकाजाची गती मध्यम राहील. लहान-मोठया अडचणींचा सामना करावा लागेल. थकित पैसे मिळण्यास अडथळे येतील. थकवा जाणवेल. पूजा-पाठात मन रमेल.

वृषभ – शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : दक्षिण
कौटूंबिक सुख आणि आर्थिक अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहिल. उद्योगधंदा चांगला चालेल. जमीन, वाहन, यंत्र इत्यादी पासून लाभ होऊ शकेल. राजकीय कार्यात परिवर्तनाचे योग आहेत.

मिथुन- शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : पश्चिम
सामाजिक कार्यांमुळे सुयश आणि सन्मान मिळू शकेल. मित्रांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. उद्योगधंदा चांगला चालेल. वैवाहिक जीवनात भावनात्मक समस्या राहू शकतात.

कर्क – शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : दक्षिण
बुद्धि आणि मनोबलाने सुख-संपन्नतेची परिस्थिती बनेल. आळस सोडून द्या. कायदेशीर प्रकरणे सुधारतील. उद्योगधंदा फायदेशीर राहिल. मुलांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

सिंह- शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : पूर्व
नवीन कामकाजांचे योग प्रबळ आहेत. कौटूंबिक समस्या राहू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल. प्रवास सुखात होईल..

कन्या- शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : पूर्व
मानसिक तनावापासून सुटका मिळेल. उद्योगधंदा ठीक चालेल. योजनेनूसार कामे केल्यास लाभ होऊ शकेल. जेवणाच्या अनियमितपणा पासून वाचा. वैवाहिक जीवन आंनदी राहिल.

तुळ – शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : पूर्व
विचार करुन कामे केल्यास परिस्थिती सुदृढ बनवू शकेल. आपल्या कामांची लोकप्रशंसा करतील. आई-वडिलांशी संबंध घनिष्ट होतील. व्यर्थ भास होतील. उद्योगधंदा चांगला चालेल..

वृश्चिक – शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : पश्चिम
कुटूंबाच्या सहकार्याने दिवस उत्साहपूर्ण जाईल. थकित पैसे मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. जास्तीचे डोके लावण्याची कामे करु नका. उद्योगधंद्यात नवीन अनुबंध होतील. परमेश्वराविषयी आस्था वाढेल.

धनु – शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : दक्षिण
योजनेनुसार कामे केल्यास फायदा होईल. मान-सन्मान वाढेल. कौटूंबिक जबाबदार्‍या पार पाडू शकाल. पराक्रम क्षमता राखल्याने कठीण कामेही पूर्ण होतील. बोलण्यावर संयम राखा.

मकर – शुभ रंग : लाल, अनुकूल दिशा : पश्चिम
दूरदर्शिपणाने आणि बुद्धिचातूर्याने समस्या दूर होतील. आडंबरांपासून दूर रहा. रोजगार, धंद्यात कमाईचे योग आहे. खर्च हिताचा राहिल. मुलांची चिंता संपेल.

कुंभ – शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : पूर्व
प्रत्येक कामात सावधगिरी बाळगा. वातावरण अनुकूल असूनही कामे होऊ शकणार नाही. खर्च विचार करुन करा. उद्योगधंदा सामान्य राहिल.

मीन – शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : पश्चिम

प्रसन्नता आणि आशादायी वातावरणामुळे प्रयत्न सार्थक होतील. आजीविकेत परिवर्तन किंवा नवीन संधी फायदेशीर राहतील. प्रवास कष्टदायी होऊ शकतात त्यामुळे तेकरणे टाळा.

You May Also Like