आजचे राशी भविष्य ; २० मे २०२१

 

मेष :  आत्मविश्वास तसेच ध्यैर्यपूर्वक पुढे जावे. यश आवश्य मिळेल. वरिष्ठ लोकात प्रतिष्ठा वाढेल. व्यापार चांगला चालेल. आपल्या व्यसनावर स्वतःच नियंत्रण ठेवावे लागेल. शुभ रंग : पिवळा, शुभ दिशा : उत्तर

वृषभ : बुद्धिचातुर्याच्या जोरावर कार्यक्षेत्रात यश मिळेल. नव्या योजनांची शक्यता आहे. अधिक लोभ, लालच करु नका. कौटुंबिक वातावरण सहकार्याचे राहिल. आरोग्य चांगले राहिल.  शुभ रंग : काळा, शुभ दिशा : पूर्व

मिथुन : दिवस प्रतिकुल राहण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरातील परिवर्तन आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत चिंतीत रहाल. मानसिक अस्थिरता राहिल. व्यापार व्यवसाय मध्यम राहिल. दांपत्य जिवन चांगले राहिल. चांगला रंग : काळा, योग्य दिशा : उत्तर

कर्क : स्वाध्यायात आवड वाढेल. आपली दुरदर्शीता आणि बुद्धिमत्तेनी काही रखडलेली  कामे पूर्ण होतील. आपल्या आवडत्या व्यक्तिची भेट होऊ शकेल. व्यापारात लाभाची स्थिती राहिल. खर्च जरा जपून करावा. शुभ रंग : हिरवा, शुभ दिशा : पूर्व

सिंह : कार्यकुशलता आणि कार्यक्षमता वाढेल. आपसातील विचार विमर्श लाभदायक ठरतील. व्यापारात चांगली स्थिती राहिल. संपत्तिच्या देवाण-घेवाणीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात मंगल कार्याची रुपरेखा ठरेल. शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा : पश्चिम

कन्या : वाहन खरेदीचा योग राहिल. व्यापारात लाभ मिळेल. आपली स्थिती, योजनेच्या अनुरुप काम करा. कुटुंबात वाद होऊ शकतो. प्रयत्न केल्या नंतर अडकून पडलेली रक्कम मिळेल. शुुभ भभरंग : हिरवा, शुभ दिशा : पश्चिम

तुळ : योग्य मार्गदर्शन घ्यावे लागेल. कामकाजातील जिज्ञासा वाढेल. लक्षाला पूर्ण करण्यासााठी योग्य प्रयत्नांची गरज. आपल्या मनावर ताबा ठेंवा. व्यापार चांगला चालेल. शुभ रंग : काळा, शुभ दिशा : उत्तर

वृश्चिक : आपला व्यवहार आणि कार्यकुशलतेनी अधिकारी वर्गाला फायदा मिळेल. व्यापारात वाढ होईल. आर्थिक क्षेत्रात प्रगति होण्याचे योग आहेत. आपल्या जिवनसाथी बरोबर भावनिक समस्या उद्भवू शकते. शुभ रंग : लाल, शुभ दिशा : पूर्व

धनु : आर्थिक कामात इच्छित प्रगति न होण्याने मानसिक अशांतता राहिल. शत्रूच्या संख्येत वाढ होईल. प्रचार-प्रसारा पासून दुर रहा. कुटुंबात चांगले वातावरण राहिल. शुभ रंग : गुलाबी, शुभ दिशा : पश्चिम

मकर : शुभ कार्यात सामिल होण्याने यश आणि मान सन्मान मिळू शकेल. पयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक प्रमाणात मिळेल. कौटुंबिक समस्येकडे दुर्लक्ष करु नका. शुभ रंग : निळा, शुभ दिशा : पूर्व

कुंभ : व्यवहार चातुर्य आणि सहनशिलतेमुळे येणार्‍या संकटातुन सुटका होईल. आपल्या कामाशी काम ठेवा. व्यापारात नविन योजना भविष्याच्या दृष्टिने लाभकारक ठरतील. शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा : उत्तर

मीन : वेळेचा लाभ जास्तीत जास्त घ्यायला हवा. व्यापारात प्रगतिचे योग आहेत. आपल्या मुलातर्फे चांगली स्थिती राखण्यात येईल. खाण्या पिण्यात अनियमितता बाळगू नका. शुभ रंग :  हिरवा, शुभ दिशा : पश्चिम

 

You May Also Like