आजचे राशी भविष्य ; २४ मे २०२१

मेष : कामे वेळेवर होतील. आर्थिक लाभ मिळाल्याने आनंद होईल. नोकरीत मनाजोगी बदली आणि पदोन्नतिचे योग बनतील. आरोग्याची काळजी घ्या. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : उत्तर

वृषभ : वाद-विवाद आणि भांडणांमुळे मानसिक त्रास वाढेल. व्यापारिक योजनात गुप्तता राखा. आर्थिक स्थिती साधारण राहील. मुलाच्या नोकरीची चिंता राहील. घाई केल्यास कामे बिघडतील.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : उत्तर

मिथुन : सज्जनांचा सहवास लाभेल. अभ्यासात मन रमेल. समाजात मान-प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळेल. व्यापारात प्रगती होईल. उधारी वसूल होण्याचे योग आहेत. प्रवासात सावधानी बाळगा.
शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : उत्तर

कर्क : वेळेवर कामे न झाल्याने घबराट होईल. खर्च अधिक होईल. व्यापार, नोकरी इत्यादी क्षेत्रात अडथळे निर्माण होऊ शकतात. परमेश्वरा विषयी आस्था वाढेल. कुणाचाही अपमान करु नका.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : पश्चिम

सिंह : कुटूंबासमवेत आनंदात वेळ जाईल. व्यापारात नवीन संबंध वाढतील, जे भविष्यात लाभकारी ठरतील. वाहन चालविताना सावधानी बाळगा. स्थायी संपत्ती वाढण्याचे योग बनतील.
शुभ रंग : लाल, अनुकूल दिशा : पश्चिम

कन्या : अधीनस्तांकडून उपयोगी संधी मिळेल. राज्यपक्षाच्या कामकाजासाठी दिवस चांगला राहिल. कुटूंबातील वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन लाभेल. जोखमीच्या, जबाबदारीच्या कामापासून दूर रहा. बक्षिस प्राप्त होईल.
शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : दक्षिण

तुळ : कौटूंबिक आणि संपत्ती संबंधीत वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मिळकतीत वाढ होईल. व्यापार फायदेशीर ठरेल. नवीन योजनांचा शुभारंभ होईल. व्यवसनांवर नियंत्रण राखा.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : पश्चिम

वृश्चिक : धाडसाने विरोधकांना पराभूत करु शकाल. सामाजिक प्रशंसनेने आनंद होईल. भौतिक सुख-साधनांच्या प्राप्तीचे योग आहेत. आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी राहू शकते.
शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : उत्तर

धनु : बुद्धि चातुर्याने कामे केल्यास आजचा दिवस चांगला ठरेल. खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करा. कोर्ट-कचेरीचे कामे निपटतील. खाण्या-पिण्यात अनियमितपणामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : पश्चिम

मकर : एखादे जुने भांडण मिटण्याची शक्यता आहे. दृढ निश्चयी असल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. कोणाचाही अपमान करु नका. कुटूंबात आनंददायी, सहकार्याचे वातावरण राहील.
शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : दक्षिण

कुंभ : कामात गुंतून रहाल. आपल्या प्रयत्नांनी घरगूती समस्या सुटतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरांवर अती विश्वास बाळगणे ठिक नाही. कामे सुरळीत होतील.
शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : उत्तर

मीन : सामाजिक कार्यक‘मात सकि‘य सहभाग राहील. महत्तवपूर्ण कामे पूर्ण करु शकाल. व्यापारात नवीन योजना लाभदायक ठरतील. सहचरिणी सोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : उत्तर

  • पंचांग : सोमवार; २४ मे २०२१

विक्रम संवत्- २०७७
शालिवाहन शके संवत्- १९४३
संवत्सर –    प्लवनाम
अयन- उत्तरणायन
मास- वैशाख
ॠतु-  वसंत
शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी २४:११:२७+
नक्षत्र : चित्रा ०९:४९:३६
योग : व्यतीपात ११:१३:१०
करण : कौलव १३:५७:३०
करण : तैतिल २४:११:२७+
सूयर् : वृषभ
चन्द्र : तुला

हिजरी सन् -१४४२

मुस्लिम मास – शव्वाल
तारीख – ११

विशेष
सोम प्रदोष

You May Also Like