आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २४ जून २०२२

 

मेष : फसगतीपासून सावध रहावे. अध्यात्मिक आवड निर्माण होईल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये अडकू नका. सहकार्‍यांशी सलोख्याने वागावे.

वृषभ : दिलासादायक दिवस राहिल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवाल.

मिथुन : काहींचे आर्थिक प्रश्न सुटतील. फावल्या वेळेचा सदुपयोग कराल. गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

कर्क : घरातील कामात वेळ द्याल. कुठल्याही वादात पडणे योग्य राहणार नाही. कलात्मक आनंद शोधावा. विषयाच्या मुळाशी जाऊन पहावे. तुमच्या विरोधात काही व्यक्ती वागू शकतात. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह : निर्माण झालेल्या समस्येचा संयमाने सामना करावा लागेल. नातेवाईकात सन्मान मिळेल. जवळचे मित्र भेटतील. अधिकारी लोकांच्या ओळखी होतील. मनाचा विचार महत्त्वाचा ठरेल. रेस, जुगार यांपासून दूर राहावे.

कन्या : प्रापंचीक जबाबदा-या पुर्ण करण्यात वेळ जाईल. जुनी येणी कमी अधिक प्रमाणात वसुल होईल. अपेक्षित ध्येयासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल.

तूळ : लिखानाचा छंद जोपासला जाईल. समस्यांचे निराकरण होईल. प्रवासात चोरांपासून सावध राहावे. भावंडांशी गैरसमजाचे प्रसंग येऊ शकतात. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : काही समस्या उद्भवून खर्चात वाढ होईल. उधारीचे व्यवहार टाळावेत. पराचा कावळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कौटुंबिक वातावरण कलुषित होऊ शकते. रागाला आवर घालावी लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. संयम बाळगावा लागेल.

धनू : उत्साही वातावरण राहील. एखादे सामाजीक कार्य घडेल. आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. मनात विचारांचा गुंता वाढवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. कौटुंबिक वातावरण तप्त राहू शकते.

मकर : आक्रमक वृत्ती टाळणे योग्य राहील. व्यस्त दिनक्रम राहील. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. मनातील संभ्रम टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रमंडळी जमवून वेळ आनंदात घालवा. प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.

कुंभ : एखाद्या घटनेत निर्णय घेतांना द्विधा मनस्थिती होईल. प्रवास होण्याची शक्यता. शारीरिक ऊर्जेची बचत करावी लागेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.

मीन : नोकरीत कामाचे कौतुक होईल. पदोन्नतीचे योग राहतील. तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल. गोष्टी व्यवस्थित समजून मग वागावे. कौटुंबिक अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी चोख राहावे लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like