आजचे राशी भविष्य ; २५ मे २०२१

१. मेष : सामाजिक कार्यक्रमात प्रशंसा होईल. वाहन, संपत्ती इत्यादीवर खर्च होण्याची शक्यता आहे. व्यापार फायदेशीर राहील. खर्चात सावधगिरी बाळगणे जरुरी आहे. कौटूंबिक सुख मिळेल.
शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : उत्तर

२. वृषभ : व्यापारात, नोकरीत धन लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळण्याचे योग आहेत. कामकाज चांगले चालेल. पोटासंबंधीचे विकारांनी त्रास होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : लाल, अनुकूल दिशा : पश्चिम

३. मिथुन : कुटूंबातील विविध मुद्यांवर वैचारीकदृष्टया विरोध राहिल. आर्थिक कारणांनी व्यापारिक संबंधात उदासीनता येईल. उगाचच संशय घेत बसू नका. धार्मिक कार्यात मन रमेल.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : दक्षिण

४. कर्क : व्यापारी भागीदारीत प्रगतीचे योग आहेत. स्थायी संपत्तीत वाढ होईल. थकीत उधारी मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. दुसर्‍यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : उत्तर

५. सिंह : व्यक्तीगत आणि प्रणय संबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरीत मनासारखी बदली आणि बढतीचे योग बनतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वाहन चालविताना सावधगिरी बाळगा.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : पश्चिम

६. कन्या : जीवनसाथीच्या प्रगतीने सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यापार-व्यवसाय चांगला चालेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. धार्मिक कामात मन रमेल.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : उत्तर

७. तुळ : आर्थिक निर्णयात आणि व्यापारात लाभ होण्याचे योग बनतील. कुटूंबात शुभ आयोजन होईल. भावनेच्या आहारी कोणताही निर्णय घेऊ नका. कायदेविषयक समस्या सुटतील.
शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : पश्चिम

८. वृश्चिक : व्यापारिक वातावरणात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. प्रवास यशस्वी आणि आरामदायक होईल. नवीन योजनांनी कार्यास सुरवात होईल. मुलाच्या वागण्याने सामाजिक प्रतिष्ठा घटेल.
शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : उत्तर

९. धनु : कौटूंबिक प्रकरणी विचार करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. व्यापार आणि संपत्ती संबंधातील कामे टाळणे हिताचे राहिल. आर्थिक स्थिती साधारण राहिल. विनाकारण वाद घालत बसू नका.
शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : दक्षिण

१०. मकर : मित्र आणि भावांच्या मदतीने व्यापार विषय समस्या सोडवू शकाल. अर्धवट राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. पैशा संबंधात वाद होण्याची शकयता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : दक्षिण

११. कुंभ : मोठयांशी व्यवहार करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. कुटूंबात विवाह विषयक कार्यक‘माचे आयोजन होईल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कामे सुरळीत पार पडतील.
शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : उत्तर.

१२. मीन : अधिकार्‍यांमध्ये आपले वर्चस्व वाढेल. व्यापारी संबंधात केलेल्या तडजोडी फायदेशीर ठरतील. कोणाचाही अपमान करु नका. वडिलांशी संबध दृढ होतील.

शुभ रंग : पांढरा, अनुकूल दिशा : उत्तर

You May Also Like