आजचे राशी भविष्य; २१ मे २०२१

 

मेष : अतिशय वाढलेली कार्यक्षमता अतिउत्साहाने कामे करायला प्रवृत्त करील. फक्त कोणतीही गोष्टअति करू नका.
शुभ रंग : केसरी, शुभ दिशा: उत्तर

वृषभ : कुटुंबात होणार्‍या प्रेमाच्या चार गोष्टी उत्साह वाढवतील. पुढे कष्टाचे वाढते प्रमाण परिश्रम करावयाला लावतील.
शुभ रंग: लाल, शुभ दिशा: उत्तर

मिथुन : मानसिक शांतता मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. घरातील वृद्धांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या.
शुभ रंग: हिरवा, शुभ दिशा: उत्तर

कर्क : काही चांगले निर्णय घेऊ शकाल. मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचे यश दृष्टीक्षेपात येईल. त्याच्या विवाहविषयक बैठका साध्य होतील.
शुभ रंग :गुलाबी, शुभ दिशा :उत्तर

सिंह : आर्थिक ओघ वेगवान राहील. गुंतवणूक सुरक्षितच होईल इकडे लक्ष द्या.
शुभ रंग:  पिवळा, शुभ दिशा: पूर्व

कन्या : खर्चाची तोंडमिळवणी सहज करता येईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची साथ अपेक्षित अशी मिळेल.
शुभ रंग: निळा, शुभ दिशा : पश्चिम

तुळ : रोजच्या कामातून थोडी उसंत मिळेल. त्यामुळे आवडीच्या गोष्टीसाठी वेळ देता येईल.
शुभ रंग: जांभळा, शुभ दिशा: पश्चिम

वृश्चिक : राजकारणातले एखादे पद, सामाजिक चळवळीचे नेतृत्व आपल्या खांद्यावर येणे शक्य.
शुभ रंग:केसरी, शुभ दिशा:पश्चिम

धनु : मित्रांचा, सहकार्‍यांचा पाठिंबा उत्साहवर्धक राहील. मनातली निराशा कुठल्या कुठे जाईल.
शुभ रंग: पिवळा, शुभ दिशा: उत्तर

मकर : चांगली गुंतवणूक वाढीस लागून व्यवसायाचे विस्तारीकरण चांगले होईल. तब्येतीची काळजी करायची गरज नाही.
शुभ रंग: लाल, शुभ दिशा: पूर्व

कुंभ : कोणतेही मोठे निर्णय राबवू नका. घरातील वृद्धांकडे वेळीच व पुरेशा गांभीर्याने लक्ष द्या.
शुभ रंग :गुलाबी, शुभ दिशा :पूर्व

मीन : इतरांच्या आग्रहाखातर एखादी वस्तू खरेदी करून आणू शकाल. वाहन खरेदीचे स्वप्न साकार होईल.

शुभ रंग: हिरवा, शुभ दिशा: उत्तर

You May Also Like