साक्री तालुक्यातील पर्यटन क्षेत्र विकास कामांना मिळणार चालना

आमदार मंजुळा गावित यांच्या पर्यटन क्षेत्र सभेत अधिकार्‍यांना सूचना
साक्री : तालुक्यातील अलालदरी-चिवटीबारी-मोहगाव-वखारदरा येथे पर्यटन क्षेत्र विकास कामांना चालना मिळणारअसून मुख्य वनरक्षक यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांच्या बैठकीत मंजुळा गावित यांनी सूचना दिल्या आहेत.
पिंपळनेर पश्चिम पट्टयात निसर्गाने अलालदरी-चिवटीबारी मोहगाव-वखारदरा या परिसरात निसर्ग सौंदर्य बहाल केले आहे. हे सर्व डोंगर गुजरात राज्याच्या सिमेलगत असुन या डोंगरावरून पांझरा,मोसम,रंगावली अश्या नद्यांचे उगम झाले आहे. पावसाळ्यात हा सर्व परिसर हिरवागार असतो. अलालदरी-चिवटीबारी-मोहगाव-वखारदरा या परिसरात बारमाही वाहणारे नैसर्गिक धबधबे, घनदाट जंगल, नागमोडी वळणाचे रस्ते, लहान मोठ्या दर्‍या, हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराची हमी मिळेल. तेव्हा या परिसरात पर्यटन विकासाची कामे हाती घ्यावेत अशी सुचना मुख्य वनसंरक्षक वनविभाग धुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार सौ.मंजुळाताई तुळशिराम गावित यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

साक्री तालक्यातील पर्यटन स्थळाचा विकास करणे व प्राचीन मंदिरे. भामेरचा किल्ला व सकापरची गढी यांचे संवर्धन करणे. पर्यटन व भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणेकामी निधीची तरतुद मिळावी म्हणुन आमदार मंजुळाताई तुळशिराम गावित यांनी मुख्यमंत्री उध्दवठाकरे व पर्यटन विकास विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांना लेखी पत्र दिले असता पत्रांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती, वनविभाग यांच्याकडे प्रस्ताव तयार करण्याबाबत पर्यावरण क्षेत्राचे कक्ष अधिकारी यांच्याकडून सुचित करण्यात आल्यानुसार मंजुळा गावित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.

या वेळी बैठकीस मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक एम.एस.भोसले, विभागीय वन अधिकारी उमेश वावरे, कोंडाईबारी आर.एफ.ओ निकस तसेच सामाजिक वनिकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी रेवती कुलकर्णी, डॉ तुळशिराम गावित, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपअभियंता यशवंत कुवर आदी उपस्थित होते.

पर्यटन विभागामार्फत उपक्रम राबवणार
पर्यटन विभागामार्फत या परिसरात रोप-वे बांधणे,सेल्फी पाँईट तयार करणे, रिसार्ट तयार करणे, काही धबधबे बारमाही करणे, लहान मुलांसाठी प्ले ग्राऊंड तयार करणे, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता गह व विद्यत व्यवस्था करणे. पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते करणे, पर्यटन स्थळांची माहिती दर्शविणारे फलक व दिशा दर्शक फलक बसविणे इ.उपक्रम राबविल्यास पर्यटकाच्या संख्येत वाढ होईल.

You May Also Like