व्यापारी संघटनांचा सोमवारपासून नाशिक शहरात जनता कर्फ्यू

नाशिक : जनता कर्फ्यू किमान आठ दिवसासाठी घेतला पाहिजे, आणि जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी नाशिक सिटीझन फोरम प्रयत्न करत आहे. जनता कर्फ्यू हा फक्त सातपूरपुरता मर्यादित न राहता नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागात सोमवारपासून जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभागात जनता कर्फ्यू लावण्यात यावा का? या विषयावर काल महाराष्ट्र चेंबरच्यावतीने आयोजित बैठकीमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले.
अनेक ठिकाणे अग्रेसर असलेले नाशिक शहर, त्या नाशिक शहराला करोना मुक्त करण्यासाठी व एक नंबरचे शहर करण्यासाठी नाशिक शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे असे मत मांडले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी विविध व्यापारी संघटनांचे प्रमुख, महाराष्ट्र चेंबर चे विविध पदाधिकारी यांचे स्वागत केले, संपूर्ण नाशिक मध्ये जनता कर्फ्यू लावता येईल किंवा नाही याबद्दल त्यांनी चर्चा केली. नाशिकची रुग्ण संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात खूप आहे. आणि ही रुग्ण संख्या आपल्या सर्वांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. असे त्यांनी मत मांडले, ज्याप्रमाणे 19 एप्रिल 2021 पासून सातपूर विभागात जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशाच प्रकारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभागात जनता कर्फ्यू लावण्यात यावा व त्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे लागेल असे मत त्यांनी मांडले.

वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले की ब्रेक द चेन यशस्वी होण्यासाठी आपल्याला जनता कर्फ्यू लावणं गरजेचं आहे, कोरोना रुग्णसंख्या नंबर मध्ये नाशिक अव्वल स्थानी आहे त्याऐवजी करोनामुक्त शहरांमध्ये नाशिकला अव्वलस्थानी आणावयाचे आहे.

माजी अध्यक्ष हेमंत राठी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज नाशिक शहराची खूपच अवघड परिस्थिती झाली आहे मागच्या आठ-दहा दिवसात वाढलेले रुग्ण संख्या बघता नाशिकची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही लॉक डाऊन परिणाम सर्वांनी भोगलेला आहे. हे जरी खरे असले तरी नाशिकचे वाढते रुग्ण बघता वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी वर्ग हा पूर्णपणे थकलेला आहे हे जर असेच चालू राहिले तर काही दिवसात वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद पडू शकते, हे सर्व थांबवण्यासाठी जनता कर्फ्यू करण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले, शहर वाचले तर मी वाचेल हे सर्वांनी ठरवले पाहिजे आणि त्यासाठी 10 ते 15 दिवस जनता कर्फ्यू लागला तरी चालेल, परिस्थिती आटोक्यात आणायचे असेल तर आपण स्वतःहून पुढे येऊन जनता कर्फ्यू केला पाहिजे.

नाशिक शाखेचे चेअरमन संजय दादलीका, जितो चे कमलेश कोठारी,अरुण लोखंडे, (जेल रोड किराणा व्यापारी संघटना), क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, सोनल दगडे, (महिला समिती ), श्याम रमय्या, विलास शिरोळे,
उपाध्यक्ष अनिल लोढा, संतोष लोढा, श्रीधर
व्यवहारे, राजेंद्र फड, स्वप्नील जैन, राजेश मालपुरे,आदी विविध मान्यवरांनी करोनाच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करून या हा संसर्ग रोखण्यासाठी सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेला एकच पर्याय आहे, तो म्हणजे जनता कर्फ्यू. आपण सर्वजणांनी याचे कडकपणे पालन करूया, नाशिक शहराला कोरनामुक्त करुया असा संकल्प व्यक्त केला.

सर्व मान्यवरांची भूमिका ऐकल्यानंतर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजच्या वतीने नाशिक शहरातील सर्व व्यापारी संघटना, नाशिक सिटीझन फोरमच्या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होतील असे जाहीर केले. वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर यांच्यातर्फे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like