‘आटपाडी नाईट्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत

मुंबई : दुनियादारी फेम अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सोशल मीडियावर या चित्रपटाची बरिच चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

वसंत बापूसाहेब खाटमोडे (प्रणव रावराणे ) म्हणजेच वश्याचं लग्न एका सुंदर मुलीसोबत (सायली संजीव) होतं. एका ज्योतिषानं सांगितलेली भविष्यवाणी त्याला आठवते आणि इथूनच या चित्रपटाची कथा सुरू होते.

ज्योतिषानं सांगितलेल्या रात्रीचा घोळाविषयीची भविष्यवाणी त्याला आठवत राहते आणि हीच भीती त्याच्या डोक्यात गोंधळ निर्माण करते. यासाठी त्याला एक मित्र बंगाली बाबांकडं जाण्याचा सल्ला देतो. वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी वश्या काय काय करतो? त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?तो कसा सुटणार? हे सर्व या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील असला तरी विनोदी रंगात दाखवल्यामुळं प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. चित्रपटातील हटके डान्स आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीच उतरत असून अनेकांनी या चित्रपटातील गाण्यावरचं हुक स्टेप चॅलेंज स्विकारलं आहे.’प्रेमाचा जांगडगुत्ता’या गाण्यावर डान्स करत अनेक चाहत्यांनी तसंच मराठी कलाकारांनी या हुक स्टेप चॅलेंज सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

‘आटपाडी नाईट्स’ चित्रपटाची निर्मिती सुबोध भावे आणि मायदेश मीडिया या कंपनीनं केली असून प्रणव आणि सायली यांच्यासह सुबोध भावे, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर यांच्या भूमिका आहेत. येत्या २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.