कत्तलीच्या उद्देशाने म्हशींची वाहतूक

शिरुड चौफुलीजवळ कारवाई
धुळे : कत्तलीच्या उद्देशाने म्हशींची निर्दयतेने वाहतुक करणारा आयशर काही गोरक्षकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केला, निर्दयतेने बांधल्याने त्यातील एका म्हैस मरण पावल्याचेही आढळले असून धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला.

धुळ्याहून शिरपूरकडे कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चाळीसगाव चौफुली ते शिरूड चौफूली दरम्यान शोध मोहिम सुरू केली. आज पहाटे तीनच्या सुमारास शिरूड चौफुलीजवळ आयशर (एमएच18/बीजी5377) पकडला. तपासणी केली असता त्यातून अवैधरीत्या जनावरे नेण्यात येत होती. याबाबत माहिती तालुका पोलीसांना देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक कैलास चौधरी, हवालदार सनी सांगळे, प्रविण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आयशरची पहाणी केली असता त्यात दाटीवाटीने म्हशी कोंबलेल्या आढळल्या. त्यातील एक म्हैस मरण पावल्याचेही आढळले. तीन लाख रूपयांच्या आयशरसह 1 लाख 8 हजार रूपये किंमतीच्या 17 म्हशी असा चार लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

प्रविण गंगाधर मंडले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आयशर चालक रशीदखान बालू खान (40, रा.बलरावळ, जि.खरगोन,मध्यप्रदेश), सहचालक नासीरखान काल्या खान (26, रा.सनकपूर, जि.धार, मध्यप्रदेश) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

बभळाज शिवारात जनावरांची वाहतूक करणारा आयशर पकडला
शिरपूर-चोपडा रस्त्यावर बभळाज (ता.शिरपूर) शिवारात जनावरांची वाहतूक करणारा आयशर ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.

थाळनेर पोलिस ठाण्यात राजस्थान येथील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. थाळनेर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर-चोपडा मार्गावर बभळाज शिवारात आयशर(एचआर38/एए6793) ताब्यात घेतला. तपासणीअंती त्यातून जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत होती. त्यात बारा जनावरे आढळली असून कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून वाहतूक केली जात होती.

याप्रकरणी हेमराज कल्याण नाथ (वय 23, रा. भिलवाडा, राजस्थान), महावीर चोथमलजी कुमार (वय 35, रा. अजमेर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुध्द थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

You May Also Like