प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेक वेळा चर्चेत असते. अनेक वेळा ती आपल्या सोशल मीडियावरुन वादग्रस्त पोस्ट करते. आजही तिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
‘तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक,’ अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ही पोस्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता करण्यात आलेली खालच्या भाषेतील टीका आहे, असं म्हणत केतकीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर केतकी सोशल मीडियावरून तिचं मत मांडत असते. टोकाची मते लिहिल्याने अनेकदा केतकीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.