धुळ्यात दोन गोरक्षकांना चौघांकडून मारहाण

वाहने अडविल्यावरुन वाद
चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धुळे : शहरातील चाळीसगाव रोड परीसरातील गोरक्षकांना मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना काल (ता.23) रात्री उशिरा घडली. याप्रकरणी पाच ते सहा जणांविरुध्द चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
प्रणील गंगाधर मंडलिक (वय 25, रा. मंगल नगर, सुमन नगरमागे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आतीक पठाण, बबू (पुर्ण नाव समजू शकले नाही) याच्यासह अन्य तीन ते चार जणांनी बुधवारी (ता.23) रात्री उशिरा चाळीसगाव चौफुलीजवळ वाद घातला. शिवीगाळ, दमदाटी करून प्रणीलसह, सोबत असलेल्या एकाला मारहाण केली, गाड्यांसमोर आला तर उडवून ठार मारण्याची धमकी दिली.

मारहाणीत प्रणील मंडलिक याच्या खिशातील पाकीट पडून गहाळ झाले. प्रणील मंडलिक याच्यासह काहींनी जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या गाड्यांची अडवणूक केली. याबाबत पोलिसांना माहिती दिली. आतीक पठाण याची गाडी पकडून पोलिस ठाण्यात जमा करा, त्यांना सोडू नका, असे बोलला होता, त्यावरुन संशयितांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाय. जे. ढिकले तपास करीत आहेत.

You May Also Like