भारतीय संघाच्या दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण

कोलंबो ।  श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना करोनाची लागण झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्या बाधित  झाल्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले. तर  शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या.

 

यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम पॉझिटिव्ह आढळले आहेत. नवीन चाचणीनंतर हो दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौथम, मनीष पांडे, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल हे खेळाडू कृणालच्या संपर्कात आले होते. टीम इंडिया आज श्रीलंकेहून घरी परतणार आहे. हार्दिक, पृथ्वी, सूर्यकुमार, मनीष, दीपक चहर आणि इशान किशन या खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

 

दरम्यान, गुरुवारी झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारत ७ गडी राखून पराभूत झाला. अशा प्रकारे श्रीलंकेने ही टी-२० मालिका २-१ने जिंकली. दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी कृणाल पांड्या पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू मालिकेबाहेर गेले.

 

 

You May Also Like