ट्रकच्या धडकेत दोन जण जागीच ठार; एक गंभीर

धुळे । मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी गावाजवळील बोराडी फाटा येथे अपघात घडला असुन यात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सखाराम पावरा, सावन पावरा अणि अमित पावरा हे एका मोटारसायकलीने आसरापाणी येथे येत असतांना आ.जे.09 जी.सी 3871 या ट्रकने मोटार सायकलीला जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले.

 

दरम्याण, घटनास्थळावरून तिघांना जखमी अवस्थेत शिरपुर उपजिल्हा रूगण्यालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी करणसिंग सखाराम पावरा वय 30 रा.हातेड पाडा व सावंन शंभु पावरा वय 18 रा.आसरापाणी या या दोघांचा अपघातात मृत्यू झाला असुन अमित पावरा वय.5 गंभीर जखमी झाला आहे. अमित यास शिरपुर उपजिल्हा रूग्णालयातुन धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

You May Also Like