मोठा निर्णय : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट आहे. या लाटेमध्ये करोना वाढती रुग्ण संख्या हि आवाक्या बाहेरची आहे, देशातील अनेक राज्यांत करोनाने आपले हातपाय पसरले असून पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक झाली आहे.याच दरम्यान,  करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असण्याऱ्यांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार असून या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होते. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. आता पुन्हा तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सरकारनं दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like

error: Content is protected !!