काश्मीरात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू । काश्मीरच्या पुलवामा येथील नागबेरन-तरसरच्या जंगलात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  तर ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जैश-ए-मोहम्मदचा लंबू आहे, जो पाकिस्तानचा टॉप मोस्ट दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मोहम्मद इस्माइल अल्वी उर्फ ​​लंबू उर्फ ​​अदनान हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा नातेवाईक होता. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याच्या कटात लंबूचाही सहभाग होता. तो फिदायिन हल्ल्याच्या दिवसापर्यंत दहशतवादी आदिल डार सोबत थांबलेला होता. आदिलच्या व्हायरल व्हिडिओमध्ये लंबूचा आवाजही ऐकू आला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

You May Also Like