बिलाडी, नकाणेतील चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलासह दोन जण एलसीबीच्या जाळ्यात

धुळे : एलसीबीच्या पथकाने चोरी प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असुन देवपूर व पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या चोर्‍या झाल्या आहे.
सविस्तर वृत्त असं कि, शहरातील मच्छी बाजार परिसरातील एका हॉटेलजवळ एक अल्पवयीन मुलगा काही वस्तू घेऊन आला असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानंतर पथकाने या मुलाकडे चौकशी केली. या अल्पवयीन मुलाने मिनाज मोहंमद रमजान अन्सारी ( वय 22, रा. ऐंशी फुटी रोड) असे नाव सांगितले. तसेच बिलाडी रोड नकाणे गाव येथून साहित्य चोरीस केल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने मिनाज याला ही ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही चोरीमधील मुद्देमाल तसेच एक मोटारसायकल जप्त केली आहे. अल्पवयीन मुलगा व मिनाज अन्सारी यांना पश्चिम देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

शहरापासून जवळ असलेल्या नकाणे गावातील विजय सुनील पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड व दागिने लांबवले. गेल्या मंगळवारी हा प्रकार समोर आला. याबद्दल शनिवारी पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तर बिलाडी फाटाजवळ सागर वाडकर याच्याघरी चोरी झाली होती. देवपूर पोलिसांत हा गुन्हा दाखल केलांय.

You May Also Like