मुंबईत दोन हजार 53 नागरिकांना बनावट लस

मुंबईः कांदिवली येथील बोगस लसीकरणाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर असे प्रकार मुंबईच्या इतर भागांतही घडत असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरु असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरणाची शिबिरी घेण्यात आली होती. एकाच टीमच्या लोकांनी नऊ वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरणाची शिबिरे घेतली होती. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेनं 23 जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अ‍ॅड अनिल साखरे यांनी कोर्टात दिली आहे. लसीकरणाचे एक शिबिर ज्या आदित्य कॉलेजमध्ये झाले त्या कॉलेजचे आशिष मिश्रा यांनाही बोरिवलीच्या एफआयआरमध्ये आरोपी केले आहे. तर, मनीष त्रिपाठी हा आरोपी फरार आहे. आतापर्यंत चारशे साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

 

बनावट लसीकरणाच्या प्रकरणात चार वेगवेगळ्या ठिकाणांवर घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरांविषयी चार एफआयआर नोंदवण्यात आले असल्याची माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी आज हायकोर्टात माहिती दिली आहे. तसंच, या बनावट लसीकरणाच्या माध्यमातून एकूण दोन हजार 53 नागरिकांना फसवण्यात आले, असल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात माहिती दिली आहे.

 

You May Also Like