अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त

मुंबई : डॉन अरुण गवळीची दगडी चाळ कुणाला माहीत नाही? याच दगडी चाळीतून गवळीने अनेक कारवाया केल्या. तीच चाळ आता जमीनदोस्त होणार आहे. गवळीचे निवासस्थान असलेल्या या चाळीचा पुनर्विकास केला जाणार असून तेथील रहिवाशांनाही घरे दिली जाणार आहेत.

याबाबतची माहिती म्हाडाचे मंडळ अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी माहिती दिली. पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झाले आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे,’ असे घोसाळकर यांनी सांगितलंय.
कुप्रसिद्ध दगडी चाळीच्या जागी 40 मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यात मूळ भाडेकरुंसाठी घरे देण्यात येतील. उर्वरित घरे विक्रीसाठी उपलब्ध असतील. अरुण गवळी मालक असलेल्या दगडी चाळीत एकूण 338 भाडेकरु आहेत. अरुण गवळीनेच पुनर्विकासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आलायं.

You May Also Like