अनलॉक! 1 जूनपासून 5 राज्ये होणार अनलॉक, पॉझिटिव्हिटी दर 22 टक्क्यांहून 1 वर

नवी दिल्ली : करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान दि.1 जूनपासून अनलॉकची सुरुवात होत आहे. देशातील पाच राज्यांत एक जूनपासून लॉकडाऊन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यात दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व केरळचा या राज्यांचा समावेश असणार आहे. तर छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांत अनलॉकची सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात किराणा, फळ व भाज्या इत्यादी सामानाची दुकाने सुरू केली जाणार आहेत. काही राज्यांत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगालचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये 8 जून व पश्चिम बंगालमध्ये 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला आहे. बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

दिल्ली: सोमवारपासून बांधकाम, कारखाने सुरू करण्याचे आदेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अनलॉक करण्याचे जाहीर केले. हळूहळू लॉकडाऊन मागे घेण्यात येईल. पण रुग्ण वाढू नयेत म्हणून मेट्रो सेवा सुरू होणार नाही. कोट्यवधी लोकांच्या कष्टामुळेच संसर्गाचा दर 1.5 टक्के एवढा कमी आला आहे.दिल्लीत एक आठवड्यासाठी बांधकाम मजूर व कारखान्यास परवानगी दिल्ली आहे.दिल्ली सरकारने व्यापक पातळीवर लसीकरण तसेच दक्षतेसाठी यंत्रणा राबवली आहे.

मध्यप्रदेश : सलून, किराणा, दुकानांना सवलत, हॉटेलवर निर्णय बाकी
मध्य प्रदेशात पहिल्यात टप्प्यात सलून, किराणा दुकानांसह फळे व भाजीपाल्याच्या दुकानांना सवलत दिली जाऊ शकते. रेस्तराँ, हॉटेल तूर्त बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री विश्वास सारंग यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. लवकरच अनलॉकच्या योजनेला अंतिम रूप दिले जाणार आहे.

राजस्थान: मिनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात मर्यादित संख्येत दुकाने सुरू
राजस्थान सरकारने 1 जूनपासून अनलॉक करण्याची योजना आखली आहे. त्याला मिनी अनलॉक नाव देण्यात आले आहे. त्यात जास्त सवलत मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात मर्यादित दुकाने सुरू होतील. त्यात खाद्यपदार्थ, दूध, फळ-भाजीपाला, किराणाचा समावेश असेल. एका शहरातून दुसर्‍या शहरात व एका गावातून दुसर्‍या गावात येण्याङ्घजाण्यावरील बंदी हटवली जाऊ शकते. खासगी वाहनांना सशर्त परवानगी दिली जाऊ शकते.

यूपी: विवाहाचे सामान, गारमेंट्स, फळ-भाजी, किराणा सुरू राहणार
उत्तर प्रदेशात एक जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेतला जाऊ शकतो. अनेक गोष्टींसाठी सवलत मिळणार आहे. परंतु वीकेंड व रात्रीची संचारबंदी सुरूच राहू शकते. 23 कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचे प्रमाण 82 टक्क्यांहून कमी झाले आहे. संसर्गाचा दर 22 टक्क्यांहून एकवर आला.

You May Also Like