अफगाणिस्तानमध्ये अमेरिका पुन्हा पाठविणार ३ हजार सैनिक?

दरम्यान, अफगाणिस्तानमधील झपाट्याने बदलणारी परिस्थिती आणि तालिबानची पकड मजबूत झाल्यामुळे अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,अमेरिका तालिबानचा सामना करण्यासाठी नाही तर अमेरिका आपल्या दूतावासातील कर्मचारी, नागरिक आणि विशेष व्हिसा अर्जदारांना तेथून निघून जाण्यासाठी मदत करण्यासाठी ३००० पेक्षा जास्त सैन्य पाठवणार आहे. हे सैनिक काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असतील. हे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांच्या परत येण्यास मदत करेल आणि त्यांना विमान सुविधा आणि सुरक्षा प्रदान करेल.

You May Also Like