धुळे महापालिकेतील 90.2 टक्के कर्मचार्‍यांचे लसीकरण

दिव्यांगांना सर्वच लसीकरण केंद्रांवर प्राधान्य
धुळे : करोनाचा वाढता संसर्ग पाहता रूग्णांवर उपचार करणारे फ्रंटलाईन अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रथम लसीकरणाने निर्देश शासनाकडून आल्यानंतर लसीकरण करण्यात आले. त्यात मनपातील 90.2 टक्के कर्मचार्‍यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. दिव्यांगांना शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.

धुळे महापालिकेच्या आस्थापनेत 26 विभाग कार्यरत आहेत. आस्थापनेतील या वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 हजार 357 अधिकारी व कर्मचारी काम काम करतात. करोनाच्या काळात रूग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी सातत्याने पुढे राहणारे फ्रंटलाईन अधिकारी व कर्मचार्‍यांपैकी 10 हजार 245 कर्मचार्‍यांना आतापर्यंत करोनाचा प्रतिकारकरणार्‍या पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. अर्थात एकूण 90.2 टक्के इतक्या कर्मचार्‍यांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. यात उर्वरित कर्मचार्‍यांनाही तातडीने लसीकरण करण्यात येवून उद्दीष्ट पुर्ण केले जाणार आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मनपातील आरोग्य विभाग, कोविड कक्ष सदैव तत्पर राहत असल्याने करोना रूग्णांच्या संख्यंवर नियंत्रण मिळविता येणे शक्य झाले आहे. लसीकरणामुळे करोना होणार नाही असे नाही परंतू सुरक्षितेचा उपाय म्हणून लसीकरण महत्वाचे असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

लसीकरण केंद्रांवर सामान्य नागरीकांच्याही रांगा लागलेल्या असतात. रांगांमध्ये दिव्यांगांना जास्तवेळ थांबावे लागू नये. करोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी दिव्यांगांना सर्वच लसीकरण केंद्रांवर प्राधान्य देण्याचा निर्णय मनपाचे अति.आयुक्त तथा कोविड कक्षाचे अधिकारी गणेश गिरी व आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे यांनी घेतल्याने दिव्यांगांसाठी सोयीचे होणार आहे. लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

You May Also Like