1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण, केंद्राने राज्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली: देशात सध्या करोनाने हाहाकर माजवला आहे. सध्याची परिस्थिति ही हाताबाहेरची असल्याने करोनाने अनेकांचा बळी घेतलाय. या पार्श्वभूमीवर देशात 1 मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे.

दरम्यान, लसीकरणाला सुरुवात होण्याआधी केंद्रानं राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याआधी अधिकाधिक खासगी सेंटर्सचं रजिस्ट्रेशन करुन घेण्याचा सल्ला केंद्रानं दिला आहे. यासोबतच लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यास आणि योग्य व्यवस्थेबाबतही केंद्रानं सल्ला दिला आहे.

तसेच, केंद्रानं या गोष्टीवर अधिक जोर दिला आहे, की या वयोगटातील लोकांचं लसीकरण केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातूनच करण्यात यावं. आरोग्य मंत्रालयानं सल्ला दिला आहे, की 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी राज्य सरकारांनी अधिकाधिक खासगी लसीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे अधिक युवकांना कमीत कमी वेळात लस देणं शक्य होईल.

मंत्रालयानं म्हटलं, की कोविन (CoWin) पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण केंद्र, लस घेतलेल्या लोकांची संख्या आणि नवीन रजिस्ट्रेशनवर नजर ठेवा. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना असं सांगितलं गेलं आहे, की 18-45 वयोगटादरम्यानच्या लोकांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीला प्राधान्य द्या. आधीप्रमाणंच आतादेखील लसीकरणासाठी आधार, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसनही मान्य केलं जाईल.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like