18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी आजपासून मिळणार लस

मुंबई : राज्यसरकारनं लसीच्या तुटवड्याचा हवाला देत आजपासून सुरू होणाऱ्या 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला असमर्थता दर्शवली आहे. मात्र. तरीही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लसीकरणाला  सुरुवात झाली आहे, ही बाब दिलासादायक आहे. बीएमसीनं सांगितलं, की 1 मेपासून मुंबईमध्ये अठरा वर्षावरील व्यक्तींना लस मिळेल. बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार, नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो फॅसिलिटी, कूपर हॉस्पिटल, सेवन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये आजपासून अठरा वर्षांवरील व्यक्तींना लस मिळेल. या केद्रांवर 20 हजार लोकांना लस दिली जाईल.

दरम्यान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिसा, तमिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, जम्मू काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी लसीची कमी असल्याचं कारण देत आजपासून लसीकरण सुरू केलेलं नाही. याशिवाय महाराष्ट्र, पंजाब आणि बिहारनंदेखील गुरुवारीच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शुक्रवारीदेखील त्यांनी पुन्हा ही बाब स्पष्ट केली. मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी लस मिळणार आहे. याआधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like