मुंबईत दुसऱ्यांदा लसीकरण थांबले !

मुंबई : राज्यात सध्या करोनाची वाढती रुग्ण संख्या अतिशय गंभीर आहे. अशात करोना प्रतिबंधक लासीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, मुंबईत आज दुसऱ्यांना लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची मोठी झुंबड उडालेली बघायला मिळाली. कारण लस उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण थांबवण्यात आल्याची घटना घडली. रविवारी रात्री मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर तब्बल दीड लाख लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला होता. या साठ्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन्ही लसींचा समावेश होता.

दरम्यान, सोमवारी सर्व लसीकरण पूर्ण झाल्यावर मंगळवारसाठी प्रत्येक केंद्रावर थोडाच साठा शिल्लक होता. खासगी रुग्णालयात तर अनेक ठिकाणी लसींचा साठा संपला होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध झाली नाही तर मंगळवारी लसीकरण मोहीम बंद पडेल अशी शक्यता होती आणि तेच चित्र आज निर्माण झाले. मुंबईच्या सर्वात मोठ्या लसीकरण केंद्रावर म्हणजे बीकेसी लसीकरण केंद्रावर आज सकाळी केवळ चारशे जणांना कोविशिल्ड ही लस देण्यात आली. त्यानंतर साठा उपलब्ध नसल्यामुळे नवीन लस घेण्यासाठी आलेले आणि कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले आहे.

कोवॅक्सीन लस घेतलेल्या लोकांना दुसरा डोस या केंद्रावर उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु त्याचा साठाही केवळ दोन हजार इतका शिल्लक राहिला आहे. तसच,  काही नागरिकांनी आधी जे टप्पे घोषित केले आहे त्या लोकांना लसीकरण पूर्ण करा आणि त्यानंतर उर्वरित किंवा नवीन टप्प्यांना लसीकरण सुरू करा अशी मागणी केलेली आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्रीपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तो साठा मिळाला तर बुधवारी लसीकरण सुरू राहील अन्यथा बुधवारीही लसीकरण बंद ठेवावे लागेल, अशी भीती या केंद्राचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ढेरे यांनी व्यक्त केली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like