तन्मय फडणवीस यांनी घेतली लस ; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण म्हणाले…

मुंबई : राज्यात सध्या करोना स्थिती बिकट असून, लसींचा तुटवडा आहे, यावरून राजकारणातही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, काल म्हणजेच सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची चर्चा रंगली होती. यामध्ये तन्मय फडणवीस लसीचा डोस घेताना दिसत आहे. सध्या देशभरात ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”.

“पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like