एका क्लिकवर उपलब्ध होणार लसीची माहिती

नवी दिल्ली : करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळं देशभरात बिकट स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरण अधिक वेगानं आणि गुंतागुंतीशिवाय गर्दी टाळून होण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हाट्सअ‍ॅप मोबाइल नंबर जाहीर करण्यात आला आहे. याद्वारे आपण आपल्या भागात लस उपलब्ध आहे की, नाही हे पाहू शकणार आहे.

करोना लसीकरणाची माहिती घेण्यासाठी आपल्याला विनाकारण कुठेही बाहेर फिरण्याची गरज पडणार नाही. लस उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी परिसरात कुणालाही विचारण्याची देखील गरज नाही. फक्त या नंबरवर पिनकोड पाठवून आपण लसीची खात्रीलायक माहिती घेऊ शकतो. लसीच्या नोंदणीनंतर लसीकरणासाठी तुमचा नंबर आल्यास त्याचे अपडेटदेखील या नंबरवर मिळू शकते. गर्दी आणि गोंधळाशिवाय लसीकरण होण्यासाठी ही व्यवस्था तयार केल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितलयं.

दरम्याण, आरोग्य मंत्रालयाकडून हा 9013151515 क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. घर बसल्या आपण या नंबरवरून करोना लसीची माहिती घेऊ शकतो. व्हाट्सअपमध्ये या नंबरवर आपला पिन कोड टाकून फक्त सेंड करायचे आहे. त्यानंतर या परिसरात लसीकरणासंदर्भात काय स्थिती आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हाट्सअ‍ॅपवर मिळणार आहे.

You May Also Like

error: Content is protected !!