रजिस्टर न करता 18 ते 44 वयोगटालाही मिळणार लस

नवी दिल्ली : काही राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांची संख्या मात्र चिंताजनक आहे. अशा स्थितीत लसीकरण वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे. त्यातच आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.

18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन अ‍ॅपवर लेुळप.र्सेीं.ळप केली जाईल. काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुळं लस वाया जाण्याचीही शक्यता आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये अद्यापही ऑनलाईन नोंदणी विषयी पुरेशी माहिती नसल्यामुळं नोंदणी होण्यात बर्‍याच अडचणी येतात.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळं दिवसाअखेरीस बर्याच वेळा उरलेली लस खराब होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतल्यानंतरही लोक लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी त्यांच्यावेळेत पोहचत नाहीत. या गोष्टींचा विचार करता लोकांना जागेवर लस देण्याच्या सुविधेमुळं लस वाया जाण्याचं प्रमाण देखील कमी होईल. मोबाईल नंबरवरून 4 जणांची अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा सरकारनं दिली असली, तरी त्यानंतरही ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन नाही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

You May Also Like