आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांच्या ज्या मागण्या योग्य आहेत

पुणे : आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांच्या ज्या मागण्या योग्य आहेत त्या मान्य केल्या जातील. तसेच राज्य सरकार त्यांच्याबाबत योग्य आणि उचित निर्णय राज्य सरकार घेईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. ते कुठलेही आंदोलन करणार नाही, असं ठरलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत उचित आणि योग्य निर्णय राज्य सरकार घेईल. ज्या आशा वर्कर्स आंदोलन करत असतील तर ते चुकीचे आहे. आशा वर्करला सगळी मदत केली जातं आहे. ज्या मागण्या योग्य आहेत त्या मान्य केल्या जातील. मात्र त्यासाठी त्यांनी आंदोलन करणे योग्य नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील आशा वर्कर्स आजपासून संपावर

योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी आजपासून राज्यातील आशा वर्कर्सने संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संपर्क सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने घेतला आहे. यानुसार राज्यातील 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत.

राज्य सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

You May Also Like