हायकोर्टाचा निर्णय अभ्यासूनच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवणार – वर्षा गायकवाड

मुंबई । राज्यात ११ वी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने जाहीर केला.  दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा नियोजित केली होती. मात्र हायकोर्टाने सर्व गोष्टींचा विचार करत निर्णय घेतला आहे.  यानंतर आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 

 

यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले कि, सीईटी परीक्षेसंदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल अभ्यासून अकरावी प्रवेशासंदर्भात पुढील निर्णय घेऊ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच अकारावीच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय प्राप्त झाल्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु करणार आहोत. हायकोर्टाचा निकाल मिळाल्यावर त्यामध्ये काय लिहिलयं ते पाहावे लागेल. अंतर्गत मूल्य़मापनाद्वारे लावण्यात आलेला निकाल मान्य करण्यात आला आहे. असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

You May Also Like