दंडात्मक वसूलीदरम्यान वाहतूक पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

बंजारातांडा जवळील घटना
साक्री : लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या आयशर वाहनातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक, कोरोना महामारीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने चालकाकडून दंडाची रक्कम वसूल करून वाहतूक पोलीस आणि साक्री शहरचे बीट हवालदार यांच्यात शाब्दिक चकमक साक्री शहरातील बंजार तांडा जवळ घडली आहे.

नेर येथुन लग्नाचे वर्‍हाड घेवून एम.एच .18/ बीजी2924 आयशर वाहन निघाले असता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत शासकीय पावती फाडण्याचे सांगितले त्याच वेळी आयशर चालकाने आताच साध्या गणवेशात असलेल्या पोलिसाला दंडाची रक्कम दिली असल्याचे सांगितले.यातून दोन पोलीस कर्मचार्‍यांमधे वाद होत असल्याचे पाहून रस्त्यावर ये-जा करणार्‍यांसह वाहतूक रस्त्यावर खोळंबली होती.

साक्री बिटचे हवलदार यांनी पावती न देता दंडाची रक्कम आयशर चालकाकडून वसूल केली.त्याच वेळी वाहतूक शाखेचे पोलीस यांनी आयशर चालकाला कोरोना नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सांगत दंडात्मक रक्कमेची पावती देऊन रक्कम दया असे सांगितले.दोन्ही पोलीसांमधे होणारा वाद टोकाला जात असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने साक्री पोलीस ठाण्यात फोन करून यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या सोबत दोन होमगार्ड सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झालेे. वाद झाल्याच्या ठिकाणी वाहन चालकांसह लग्न वर्‍हाडासह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

You May Also Like