नाफेडच्या नोडल एजन्सीचे कागदपत्रांची पडताळणी, कांदा लिलाव बंद व पुन्हा सुरु

लासलगाव येथील नाफेडचे वतीने एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी लावलेल्या खरेदीच्या बोलीनंतर बंद पडलेले कांदा लिलाव बाजार समितीत सभापती सौ सुवर्णा जगताप यांचेसह संचालक व व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये नाफेडच्या वतीने नोडल एजन्सीचे कागदपत्रे
पडताळणी नंतरच बाजार समितीत कांदा खरेदीच्या सुचना देण्यात आल्या आहेत अशी माहीती सभापती
सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

सकाळी लिलावाचे कामकाज बंद झाल्यावर दुपारी एक वाजता सभापती सुवर्णा जगताप यांचे अध्यक्षेतखाली संपन्न झालेल्या बैठकीत संचालक शिवनाथ जाधव, ललित दरेकर सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी वर्गाचे वतीने नंदकुमार डागा, नितीन जैन, ओमप्रकाश राका, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, विवेक चोथाणी, मनोज जैन , राजेंद्र मुनोत, अफजलभाई शेख, उपस्थित होते. बैठकीत व्हेफको संस्थेचे शरद होळकर व कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती
साधना जाधव यांनी आपणास नाफेडने
संस्थेला कांदा खरेदीकरीता नाफेडने नोडल एजन्सी नेमल्याचा दावा केला.असता दोन्ही संस्था प्रतिनिधी यांना अधिकृत एजन्सीचे कागदपत्रे सादर केल्यानंतरच पडताळणी होऊन नाफेडचे वतीने कांदा खरेदी करू देण्यात येणार आहे. असा निर्णय झाला. त्यानंतर कांदा लिलाव पुर्ववत सुरू झाले.

You May Also Like