ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

मुंबई : साराभाई वर्सेस साराभाई, एक हजारों में मेरी बहना है यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे रविवारी निधन झाले. तरला जोशी यांच्या निधनाचे कारण अजूनही समोर आलेले नाही. अभिनेत्री निया शर्माने रविवारी, 6 जून रोजी संध्याकाळी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून तरला जोशी यांच्या निधनाची बातमी शेअर केली.

नियाने तरला जोशी यांच्यासोबत मएक हजारों में मेरी बहना हैफ या मालिकेत काम केले होते. नियाने तरला जोशी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. प्रसिद्ध अभिनेत्री अंजु महेंद्रूने देखील तरला जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तिने लिहिले ,फतरलाजी आम्हाला तुमची खूप आठवण येणार आहे. तुमच्याकडे मी नेहमी आई म्हणूनच पाहिले आहे. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली!!!

You May Also Like