विकी कौशल अन कतरिना कैफच्या साखरपुड्याच्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई । सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला असून रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला होता. यावर आता विकी आणि कतरिनाच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

 

 

गेल्या काही वर्षांपासून विकी आणि कतरिना एकमेकांनी डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलंय. असं असलं तरी दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. यातच विकी आणि कतरिनाने साखरपुडा केला असून त्यांचा रोकादेखील झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र चाहत्यांच्या आनंदावर विरजण पसरलं आहे.

You May Also Like