विघ्नहर्ता रूग्णालयाची साडेसहा लाखांची रोकड लांबवली

दोघांना केले जेरबंद
धुळे : नकाणे रोडला लागून असलेल्या विघ्नहर्ता रुग्णालयाची 6 लाख 37 हजारांची रोकड लांबवण्यात आली असल्याची घटना घडलीयं. याप्रकरणी पोलिसांनी आकाश पानपाटील, विक्की शेजवळ या दोघांना अटक केली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नकाणे रोडला विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या व्यवहारातील सुमारे 6 लाख 37 हजार रुपयांची रोकड घेवून कर्मचारी गोकुळ वाणी बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. कॅनरा बँकेत ही रक्कम भरणा करण्यासाठी जात असतांना नकाणे रोडवर त्यांना पाच जणांच्या टोळीने अडवले. शिवीगाळ, दमदाटी करत त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर 6 लाख 37 हजारांची रोकड, तीन धनादेश व इतर वस्तू डिक्कीतून काढले. त्यानंतर हे टोळके पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख व त्यांचे पथक दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर तासाभरात टोळके निष्पन्न झाले. तसेच आकाश पानपाटील, विक्की शेजवळ या दोघांना ताब्यात घेतले. इतर तिघांचा पोलिस शोध घेत आहे. पोलिस निरिक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले की, घटनेनंतर तक्रारदारांनी सांगितलेल्या वर्णनावरुन शोध सुरू झाला. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कबुली दिली.

यापूर्वीही रक्कम लुटीचा घडलाय प्रकार
पुर्वी हे रुग्णालय जयहिंद कॉलनी येथे होते. दि.14 ऑगस्ट 2018 रोजी रुग्णालयाची सुमारे अडीच लाखांची रोकड लुटण्यात आली होती. घटनेबद्दल देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयितही मिळाले.

You May Also Like