धुळयात ब्रेक द चेनचे उल्लंघन; 101 दुकानांना दंड

धुळे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात 31 मे 2021 पर्यंत ङ्गब्रेक द चेनफ बाबतचे आदेश लागू आहेत. या आदेशाचे पालन न करणार्‍या धुळे शहरातील 101 दुकानदारांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर विना मास्क फिरणार्‍यांविरुध्द 158 केसेस करुन 17 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती धुळे शहर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
धुळे जिल्ह्यात करोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे शासनाने कोरोना विषाणूचा ( कोविड -19) प्रसार रोखण्यासाठी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी ब्रेक द चेन निर्देश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. धुळे शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये, मास्कचा नियमित वापर करावा, सोशल डिस्टस्निगंचे पालन करीत पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना कामकाजाची वेळ ठरवून दिली आहे. त्यानंतरही नागरिक विनामास्क आणि विनाकारण बाहेर फिरतांना आढळून येत आहेत. याशिवाय काही आस्थापना, नागरिक शासनाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. पिंगळे यांनी म्हटले आहे. धुळे शहर उपविभागातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये जीवनाश्यक आस्थापना वगळता इतर आस्थापना, हॉटेल यांचेवर कारवाई करण्यात येवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 101 दुकान, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विना मास्क फिरणार्‍यांवर 158 केसेस करण्यात येवून 17 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विना कारण रस्त्यावर फिरणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 219 वाहन चालक यांच्यावर मोटार वाहन
कायदा अन्वये केसेस करण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टस्निगंचे पालन करुन पोलिस विभागास व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. पिंगळे यांनी केले आहे.

You May Also Like