Vodafone Idea च्या ‘या’ प्लानमध्ये मिळतो तब्बल १०० जीबी डेटा, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली । टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान्स आणत आहे. विकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाइट डेटा ऑफरसह वीआय इतर कंपन्यांना टक्कर देत आहे. ज्या ग्राहकांना जास्त डेटाची आवश्यकता असते, अशांसाठी देखील कंपनीकडे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या प्लान्समध्ये कंपनी ५० जीबी आणि १०० जीबी डेटा ऑफर करते.
तुम्ही जर Vi चे ग्राहक असाल व कोणत्याही डेली लिमिटसह येणारे प्लान शोधत असाल तर कंपनीचे दोन रिचार्ज प्लान तुमच्या फायद्याचे ठरतील.
Vi चा पहिला डेटा रिचार्ज प्लान २५१ रुपयांचा असून यामध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह ५० जीबी डेटा मिळतो. हा डेटा ग्राहक कोणत्याही लिमिटशिवाय कधीही वापरू शकतात.
वोडाफोन आयडियाचा दुसरा प्रीपेड प्लान ३५१ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात ग्राहकांना ५० नाही तर १०० जीबी डेटा मिळतो. ग्राहक एका दिवसात देखील १०० जीबी डेटा वापरू शकतात. डेटा वापरण्यासाठी कोणतेही लिमिट नाही.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या दोन्ही प्लानमध्ये इतर कोणतेही बेनिफिट्स मिळत नाही. हा केवळ डेटा पॅक आहे. कॉलिंग आणि एसएमएस सारख्या सुविधेसाठी इतर रिचार्ज प्लान्स घ्यावे लागतील.

You May Also Like