प्रतिक्षेत असलेले वन विभागाचे कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

सेवा ज्येष्ठतेचे नियम धाब्यावर, वनसंरक्षकाचा मनमानी कारभार
धुळे :

धुळे प्रादेशिक वनवृत्ताचे वनसंरक्षक दी.वा.पगार यांनी पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरणे आवश्यक होते. परंतू पगार यांनी शासनाच्या पत्राविरूध्द नियमबाह्य कार्यवाही केली. प्रतिक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांना ताटकळत ठेवून 1/3 कर्मचार्‍यांचे पदोन्नतीचे निर्देश दिले. यामुळे उर्वरित सेवा ज्येष्ठतेवर विपरित परिणाम होणार आहे. यातून वन संरक्षक पगार यांचा मनमानी कारभार उघड झाला असून पदोन्नतीचे निर्देश रद्द करण्याची मागणी रवींद्र इंगळे यांनी मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केलीे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दी.वा.पगार वनसंरक्षक प्रादेशिक,धुळे यांनी पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरणे आवश्यक होते. परंतू त्यांनी तसे न करता दि.29 डिसेंबर 2017 चा रद्द झालेल्या शासन पत्रकाच्या अनुषंगाने नियमबाह्य कार्यवाही केली. त्यात धुळे वनवृत्तातील पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांना ताटकळत ठेवून 1/3 कर्मचार्‍यांना पदोन्नतीचे निर्देश दिले. त्यामुळे सेवाज्येष्ठतेवर परिणाम होणार आहे. वनसंरक्षक पगार यांनी अधिकाराचा गैरवापर करून मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. दि.7 मे 2021च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्तपदे पगार भरू शकत होते. परंतू पदे बदली व पदस्थापनेच्या हेतूने भरण्याच्या दृष्टीकोनातून रिक्त ठेेवल्याची वनविभागात चर्चा आहे. पगार यांच्या मनमानी कारभाराबाबत वरिष्ठांपर्यंत खबर पोहचली आहे. परंतू वरिष्ठांकडूनही कारवाई केली जात नसल्याने हतबल असल्याचे दिसून येते. धुळ्यातील वनसंक्षकांनी शासन निर्णयाचे उल्लंघन करून काढलेले निर्देश अपर मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट व वनोपज) नागपूर यांनी आपल्या स्तरावर रद्द करावे अशी मागणी रवींद्र इंगळे यांनी केली आहे.

You May Also Like