नाशिक मनपाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या वाॅररूमची व्यवस्था निष्फळ

सिडको : नविन नाशिक येथील मनपा विभागीय कार्यालयात वाॅररूमची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतू येथील स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याने लोक हैराण झाले अाहे.वॉररूम फक्त नावापुरतेच असल्याचे निदर्शनास येत आहे.

मनपा प्रशासनासनाने मोठ्या प्रमाणात वाजा गाजा करित वाॅररूम स्थापन केले असून येथे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही आहे.त्यात शिक्षक कर्मचारी वर्गाला वाॅररूमची व्यवस्था सांभाळायाला दिल्याने सर्व काम राम भेरोसे चालू आहे.

यात (खाजगी अथवा सरकारी हाॅस्पीटल) बेड उपलब्धता-सी बी आर एस सिस्टिम,कोरोना केअर सेंटर,होम कोरंनटाइन व लसीकरणतसेच आरटीपीसीआर टेस्टची फोन करूनही माहिती मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे.त्यातही मनपाच्या संकेतस्थळावर बेड उपलब्धेची माहिती अपडेट होत नसल्याने नागरीकांन फक्त फोन नंबर देऊन मनपा प्रशासन जणू काही उपकार करित आहे.

नाशिक महानगरपालिकेने परिपत्रक काढीत वाॅररूम सूरू करण्याची घोषणा केली खरी पण ती निष्फळ ठरल्याने मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
नाशिक मनपाच्या वतीने कोरोना बाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी या दृष्टीने सर्व विभागातील कार्यालयांतर्गत कोविड-१९ सहाही विभागीय कार्यालयात स्वतंत्र वाॅररूम स्थापन करण्यात आले आहे असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी १२ एप्रिल रोजी पत्रकाद्वारे दिली.

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने व नागरिकांना कोरोना बाबतची माहिती व सहकार्य मदत मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील कार्यालयांतर्गत कोविड १९ विभागीय वाॅररूम स्थापन करण्यात आले आहेत. याद्वारे नागरिकांना सी बी आर एस सिस्टिम,कोरोना केअर सेंटर,होम कोरंनटाइन व लसीकरण इत्यादी बाबतची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी २४ तास स्वतंत्र व्यवस्था विभागवार करण्याचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते.

त्या अनुषंगाने नाशिक पुर्व – नाशिक पश्चिम – पंचवटी -नाशिकरोड – नवीन नाशिक सातपुर या सहा विभागीय कार्यालयात कोविड – १९ विभागीय वाॅररूम स्थापन करण्यात आले असून या वाॅररूमच्या माध्यमातून नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणार होते.तरी नागरिकांनी त्यांच्या विभागातील माहितीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करून माहिती घ्यावी असे आव्हानही मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एसबसिस्टिमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी केले.पऱतू मनपा प्रशासनसाने स्थापन केलेल्या वाॅररूमला कोणत्याही प्रकारची माहिती लवकर उपलब्ध होत नसून कर्मचारी वर्ग वरिष्ठ अधिकार्‍यांवर ढकलगाडी करित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like