”करोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी”; ‘या’ काँग्रेस नेत्याचं विधान

नवी दिल्ली : देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांमध्ये करोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.हि परिस्थिती सरकार आणि आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर झाली आहे. दरम्यान  काँग्रेसच्या एका नेत्याने “कोरोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी” असं म्हटलं आहे.

राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. हे ट्विट करताना गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या विधानाचा हवाला दिला आहे.

ते या ट्वीट मध्ये म्हणाले कि, “सोनिया गांधी बरोबर म्हणतात की, करोना संक्रमणाच्या प्रसारासाठी आम्ही राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी आहोत. आता कोरोना नव्या रुपात प्रकट झाला आहे आणि देशात भयावह स्थिती निर्माण होत चालली आहे. इतकंच नाही, तर कर्फ्यू आणि लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीप्रमाणेच राज्यांसोबत चर्चा करायला हवी” असं अशोक गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like